Chemists protest: ऑनलाईन औषध विक्री बंद करा

डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Chemists protest: ऑनलाईन औषध विक्री बंद करा
Published on
Updated on

बेळगाव : ऑनलाईन फार्मसींमुळे पारंपरिक किरकोळ औषध विक्री दुकाने अडचणीत आली आहेत. त्यामुळे, ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, अशी मागणी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनने (बीडीआरपीए) बुधवारी (दि. २०) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनतर्फे बुधवारी सरकारने ऑनलाईन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी देशव्यापी बंद पुकारला होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्ष बंडू सदलगे, सचिव सुधीर नंजन्नावर यांच्या नेतृत्वाखाली दंडावर काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. औषध दुकानदारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. औषधांची ऑनलाईन विक्री, कॉर्पोरेट साखळी फार्मसी दुकानांकडून ग्राहकांना मोठ्या सवलती देऊन आकर्षित करणे आणि बोगस डॉक्टरांना थेट मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरवठा या कारणांमुळे राज्य व देशभरात अनेक किरकोळ दुकाने बंद पडत आहेत.

बनावट औषधांच्या विक्रीमुळे तरुण पिढी आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी आम्ही ऑनलाईन औषध विक्रीच्या तीव्र विरोधात आहोत. पारंपरिक किरकोळ फार्मसींचे अस्तित्व धोक्यात येण्याची आणि रुग्णांना थेट औषधे विकणाऱ्या डॉक्टरांकडून जीएसटी चुकवल्यामुळे सरकारच्या महसुलाचे नुकसान होण्याची भीती आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन ऑनलाईन फार्मसी बंद कराव्यात, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news