Belgaum News : जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पकडले

गोकाकमध्ये अड्डा; बेळगावातून पंटर, पाच लाख जप्त
Gambling Raid
जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पकडलेPudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः जुगार खेळणाऱ्या 17 जणांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 72 हजाराची रोख रक्कम व 4 लाख 61 हजार रुपये किमतीचे तब्बल 17 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. गोकाक ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अज्जनकट्टी गावच्या हद्दीत ही कारवाई केली.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये प्रकाश मुळगुंद (जैन गल्ली, गोकाक), नागराज एनगी (सांबरा, बेळगाव), अरविंद प्रकाश बडीगेर (महालिंगपूर, ता. मुधोळ), विश्वा शरणाप्पा पट्टणशेट्टी (बसवनगर, गोकाक), वरुण लक्काप्पा तळवार (24, रा. कुरबरदड्डी, ता. गोकाक), करेप्पा सिद्धाप्पा धर्मट्टी (रा. बसळीगुंदी, ता. गोकाक), केशव होळेप्पा कुरी (मालदिन्नी), यल्लाप्पा बाळाप्पा आरेण्णावर (आदिजांबवनगर, गोकाक), अरुण केंपाण्णा घोरपडे (गोकाक), जयाप्पा पोमाप्पा लमाणी (ओबळापूर तांडा, ता. रामदुर्ग), असिफ बाबू देसाई (करगुप्पी, ता. हुक्केरी), मीरासाब दस्तगीरसाब मुल्तानी (हिडकल डॅम), यासीन नबीसाब फनीबंद (शिंदी कुरबेट), महेश करीअप्पा कवडीकाई (आश्रय कॉलनी, गोकाक), सिद्धाप्पा हालप्पा सन्ननायक (मिडनकट्टी, ता. गोकाक), लक्ष्मण सन्नयल्लाप्पा कोप्पद (तेळगीनट्टी, ता. गोकाक) व सोमलिंगाप्पा रेवाप्पा मुत्नाळ (रा. सुतगट्टी, ता. धारवाड) यांचा समावेश आहे.

हे सर्वजण गोकाक शहरापासून काही अंतरावर असलेल्या अज्जनकट्टी गावच्या हद्दीत सार्वजनिक व खुल्या ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती गोकाकचे उपनिरीक्षक के. बी. वालीकर यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता उपरोक्त सर्वजण सापडले. त्यांच्याकडील सर्व रक्कम व मोबाईल जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news