Belagavi fuel price: बेळगावात पेट्रोल १०६.९३; डिझेल ९४.९०

पाच दिवसांपूर्वी लिटरमागे तीन रुपयांनी इंधनात वाढ झाली होती. मंगळवारी (दि. १९) पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली
Belagavi fuel price: बेळगावात पेट्रोल १०६.९३; डिझेल ९४.९०
Published on
Updated on

बेळगाव : पाच दिवसांपूर्वी लिटरमागे तीन रुपयांनी इंधनात वाढ झाली होती. मंगळवारी (दि. १९) पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. शहरात पेट्रोल प्रतिलिटर १०६ रुपये होते. ते आता १०६.९३ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ९४ वरून ९४.९० रुपयांवर, तर पॉवर पेट्रोल ११६ वरून ११६.८८ रुपयांवर पोहोचले आहे. दरात काही पैशांत वाढ झाली असली, तरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झाल्याचे कारण पुढे करत मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

सातत्याने इंधनात वाढ होत राहिली, तर बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news