Online gaming fraud: ऑनलाईन गेमचे आमिष; 14.50 लाखांची फसवणूक

ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 14 लाख 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला
Online Gaming
Online Gaming Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 14 लाख 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. 12) शहर सीईएन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मोबाईलवर फेसबुक खाते पाहत असताना ‌‘डायमंडेक्स 99 नाऊ‌’ संकेतस्थळावर गेम खेळून पैसे मिळवता येतील, अशी जाहिरात दिसली. अधिक पैसे मिळण्याच्या आशेने फिर्यादीने संबंधित लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्याने आपला मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर 8073509656 या क्रमांकावरुन व्हॉट्स ॲप संदेश प्राप्त झाला. फिर्यादीने संबंधित व्यक्तीला हॅलो असा संदेश पाठविल्यानंतर समोरुन वेलकम टू स्मॅश ऑनलाईन बुक असा संदेश आला. यासोबतच फिर्यादीला पासवर्ड, आयडी नेम ‌‘झुबेरदी46‌’ आणि गेमची लिंक पाठविण्यात आली. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

फिर्यादीने 23 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 14 लाख 500 हजार रुपये विविध खात्यांमध्ये भरुन घेण्यात आले. गेममध्ये अधिक नफा मिळेल आणि मोठी रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखवत वारंवार अधिक पैसे भरण्यासाठी चॅटद्वारे दबाव टाकण्यात आला. मात्र, पैसे जमा केल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news