Online fraud case: शिरस्तेदाराची ९९ हजारांची फसवणूक

ऑनलाईन कार बुकिंगचा बहाणा , गुगल स्क्रीन शेअर करून रक्कम लंपास
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

बेळगाव : ऑनलाईन कार बुकिंग करताना गुगल मीटद्वारे मोबाईलची स्क्रीन शेअर करुन प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील शिरस्तेदाराची ९९ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

तक्रारदार संजीव मुत्तेप्पागोळ (रा. गोकाक) बेळगावमधील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात शिरस्तेदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २७ मार्च २०२६ रोजी ऑनलाईनद्वारे भाड्याची कार बुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी लक्ष्मी कार रेंटल गोवा या वेबसाईटशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या नीलम राजपूत नावाच्या व्यक्तीने ९०३४४०१२६५ या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला. शहरातून विमानतळापर्यंत जाण्यासाठी ८०० रुपये भाडे असल्याचे सांगण्यात आले. संबंधित ॲप मोबाईलवर डाउनलोड होत नसल्याने विशाल महेश लाडवा याच्या जी-पे खात्यामार्फत संबंधित व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर फोनपे द्वारे १४९ रुपये पाठविण्यात आले. मात्र, रक्कम भरल्यानंतरही कार बुकिंगची पुष्टी झाली नाही.

त्यानंतर पुन्हा त्या संशयित व्यक्तीने तक्रारदार संजीव यांना संपर्क साधून मोबाईलवर ॲप डाउनलोड करुन देत असल्याचे सांगितले. त्यासाठी गूगल मीटद्वारे मोबाईल स्क्रीनवर पैसे पाठवले याबाबतचा स्क्रीन फोटो पाठवा असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने स्क्रीन शेअर केल्यानंतर त्यांच्या एसबीआय खात्यातून तब्बल ९९ हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news