Nipani Snake Rescue | डिकीत शिरला साप; बाहेर काढण्यासाठी संपूर्ण दुचाकी खोलली; निपाणी बाजारपेठेत २ तास थरार

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश
 Nipani Snake Found In Scooter
निपाणी : दुचाकी खोलून सापाला सुरक्षितपणे बाहेर काढताना सर्पमित्र संतोष चौडकीPudhari
Published on: 
Updated on: 

Nipani Snake Found In Scooter

निपाणी : बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांच्या अॅक्टिव्हाच्या डिकीत साप शिरल्याने निपाणीतील कित्तूर राणी चन्नमा सर्कल परिसरात शनिवारी सायंकाळी एकच खळबळ उडाली. डिकीत साप असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या महिलांनी नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

बुदलमुख पांगिरे येथील सुपर बाजारात दोन महिला दुचाकीवरून खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांनी आपली अॅक्टिव्हा बाजारासमोर उभी केली होती. खरेदी आटोपल्यानंतर त्या दुचाकीजवळ आल्या असता डिकी उघडताना त्यांना आत साप असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली.

 Nipani Snake Found In Scooter
Nipani Crime : डोळ्यात चटणी टाकून दोन लाख लुटल्याचा बनाव; एकजण पोलिसांच्या ताब्यात

या प्रकाराची माहिती सुपर बाजारचे मालक सचिन गायकवाड यांनी सर्पमित्र संतोष चौडकी यांना दिली. काही वेळातच चौडकी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुचाकीची काळजीपूर्वक तपासणी सुरू केली. साप नेमका कुठे लपला आहे, याचा शोध घेताना दुचाकीचे नुकसान होऊ नये आणि सापालाही इजा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्यात आली.

साप दुचाकीच्या आतील भागात खोलवर जाऊन लपल्याने त्याला बाहेर काढणे आव्हानात्मक ठरले. अखेर सापाचा ठाव घेण्यासाठी दुचाकीचा आतील भाग उघडावा लागला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर चौडकी यांनी सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

 Nipani Snake Found In Scooter
Nipani Murder : जुना वाद, वर्चस्वातून निपाणीत युवकाचा खून

साप बाहेर येताच संबंधित महिला तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्रांनी सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. या घटनेमुळे काही काळ बाजार परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news