Belagavi news: चूक मुलीची, जीवन संपवले आईने...!

सलाईनमधून पतीला विष देणाऱ्या महिलेच्या आईने घेतला गळफास
Belagavi news: चूक मुलीची, जीवन संपवले आईने...!
Published on
Updated on

बेळगाव : माझ्या मुलीने असे कसे केले, आता समाजात तोंड दाखवायला जागा नाही, असा विचार करत सलाईनमधून पतीला विष देणाऱ्या सुमा मंजरगी हिच्या आईने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.

महादेवी मल्लाप्पा बादामी (वय ६४, रा. घोडगेरी, ता. हुक्केरी) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला. काही दिवसांपूर्वी निवृत्त लष्करी जवान संदीप मंजरगी (रा. घोडगेरी) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. हा खून त्याची पत्नी सुमा, प्रियकर पुंडलीक यांनी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाला कलाटणी मिळत आतापर्यंत नऊजणांना अटक झाली आहे. हे प्रकरण भयंकर असल्याने राज्यभरात चर्चा सुरु असतानाच, घोडगेरी गावातही जोरदार चर्चा रंगली होती. ही चर्चा कानावर पडल्याने तसेच टीव्हीवर सर्वकाही पाहून सुमाची आई महादेवी काही दिवसांपासून व्यथित होत्या.

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मौनव्रत धारण केले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आपल्या मुलगीने असे कसे केले, आपल्या जावयाला मुलीनेच मारून टाकले, यावर आपला विश्वास नाही, असे त्या बोलत होत्या. शिवाय सुमाच्या अनैतिक संबंधाची तसेच दोन कोटींच्या विमा रक्कमेसाठी हे सर्व केल्याची चर्चादेखील गावात होती. हे सर्व ऐकून यातूनच त्यांनी जीवन संपवल्याची गावात चर्चा होती. यमकनमर्डी पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक जावेद मुशापुरी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news