Belgaum Mobile Theft : मोबाईल लांबवून दीड लाखांची फसवणूक

सौंदत्तीतील प्रकार : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत मोबाईलची चोरी
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

बेळगाव : सौंदत्ती बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी करुन त्यावरील डिजिटल पेमेंट ॲपचा गैरवापर करत एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ५० हजार १५० रुपये परस्पर काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौंदत्ती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ८ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सौंदत्ती बसस्थानकात धारवाडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला. मोबाईल चोरी झाल्यानंतर संशयितांनी त्यातील फोन-पे ॲपचा वापर करुन फिर्यादींच्या बँक खात्यातील रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग केल्याचे समोर आले आहे.

९ मे रोजी सायंकाळी ५.३६ ते रात्री ७.११ या कालावधीत सात व्यवहारांद्वारे प्रत्येकी पाच हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर ११ व १२ मे रोजीही आणखी काही ऑनलाईन व्यवहार करण्यात आले. या सर्व व्यवहारांमधून संशयिताने एकूण १ लाख ५० हजार १५० रुपये परस्पर हस्तांतरित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. सोमवारी (ता. २५) या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली. दरम्यान, मोबाईलमध्ये बँकिंग अथवा यूपीआय अॅप वापरणाऱ्या लोकांनी सुरक्षा पिन, स्क्रीन लॉक आणि व्यवहार अलर्ट यांसारख्या सुविधा सक्रिय ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news