Minor girl assault case: अल्पवयीन युवतीवर अत्याचार, तरुणाला अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक केली
Minor girl assault case
Minor girl assault casePudhari
Published on
Updated on

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक केली. सोहेल अब्दुल नदाफ (वय 20, रा. गँगवाडी, शिवबसवनगर) असे संएशयिताचे नाव आहे. सदर तरुणाने एका 17 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर तिला धमकावत तो गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने तसा प्रकार करत राहिला. सदर युवतीने या प्रकरणी मार्केट पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी शनिवारी सदर तरुणाला अटक केली. त्याच्यावर बालअत्याचार प्रकरणांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news