Belagavi railway: लांब पल्‍ल्‍याच्‍या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

नैर्ऋत्य रेल्वेच्यावतीने काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे
Railway
Railway Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : नैर्ऋत्य रेल्वेच्यावतीने काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जोधपूर-बंगळूर द्वि साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. २५ पासून घटप्रभा येथे स. ८.४३ ऐवजी ८.२८ वा. पोहोचणार आहे.

पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक स. ७. ५८ ऐवजी ८.२० वा. पोहोचेल, असे नैर्ऋत्य रेल्वेच्यावतीने कळविण्यात आले आहे. हीच रेल्वे बेळगाव येथे स. ९. ५० ऐवजी ९.३५ वा. पोहोचणार आहे. बंगळूर- गांधीधाम साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस दि. २६ रोजी बेळगावमध्ये स. १०.०५ ऐवजी ९.३५ वाजता येणार आहे. अजमेर- म्हैसूर एक्स्प्रेस दि. २७ रोजी स. ९. ४५ ऐवजी ९. ३५ वाजता दाखल होणार आहे.

अजमेर-बंगळूर साप्ताहिक रेल्वे स. ९. ४५ ऐवजी ९. ३५ दाखल होणार आहे. जोधपूर - बंगळूर एक्स्प्रेस दि. २९ पासून बेळगाव येथे स. ९. ४५ ऐवजी ९.३५ वाजता पोहोचणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news