Belgaum News: जिल्ह्यातील 1200 शाळांमध्ये कायदा जागृती

प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक : पोक्सो, बालविवाहाबद्दल ज्ञान आवश्यक
Belgaum News
Belgaum News: जिल्ह्यातील 1200 शाळांमध्ये कायदा जागृतीPudhari
Published on
Updated on

बेळगाव : पोक्सो, बालविवाह, बालकामगार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील 1200 शाळांमध्ये शनिवारी 7 रोजी सकाळी 9.30 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना न्यायाधीश आणि सल्लागार कायद्याची माहिती देणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली माहितीपर चित्रफित दाखविली जाणार आहे. पहिल्यांदाच भव्य जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी बुधवारी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना नायक म्हणाले, अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले जातात. अशा अपराध्यांविरुद्ध कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. मात्र अत्याचार झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मात्र बरेच जण घाबरून तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. परिणामी अत्याचार करणारे मोकाट फिरतात. तेव्हा प्रत्येकाने कायदा जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठीच ही जनजागृती करण्यात येत आहे.

बालविवाह, बालकामगार प्रतिबंधक कायदेही असून, त्यांची सर्वांनाच माहिती असणे गरजेचे आहे. विद्यार्थीदशेपासून जर कायद्याची जनजागृती झाली, त्याचा अधिक फायदा होणार असल्याने शाळांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे न्यायाधीश नायक यांनी सांगितले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news