Bear Attack Belagavi | खानापूर तालुक्यात अस्वलाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील शेतकरी महेश गावडे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी
  bear attack
bear attack(Pudhari Photo)
Published on
Updated on

Khanapur Farmer Injured Bear Attack

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील शेतकरी महेश गावडे यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे नेहमीप्रमाणे आपली गाय चारण्यासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेले होते. सायंकाळी जनावरे घेऊन घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे गावडे यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपड करावी लागली.

  bear attack
Belgaum news : म. ए. युवा समितीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी ; अन्याय थांबविण्याचे आवाहन

हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळील झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच अस्वलाने त्यांच्यावर झडप घालत पायाला चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही जखमा झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी अवस्थेतील महेश गावडे यांना तातडीने उपचारासाठी बेळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, खानापूर तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अस्वलाच्या हल्ल्यामुळे हुळंद आणि आसपासच्या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने या परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  bear attack
Belgaum News: पत्नी माहेरी गेल्याने एकाने जीवन संपवले

या घटनेमुळे जंगल परिसरात जाणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news