Priyank Kharge | बेळगावसह राज्यभर ड्रग्ज माफियांचे जाळे : गृहमंत्री प्रियांक खर्गे

लवकरच कारवाई
Priyank Kharge
Priyank Kharge
Published on
Updated on

बंगळूर : अमली पदार्थांचा व्यापार केवळ बंगळूरपुरता मर्यादित नसून मंगळूर, म्हैसूर, हुबळी, बेळगाव व गुलबर्गा जिल्ह्यांमध्येही जाळे आहे. इथे पुरवठा आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून केला जात आहे. हे रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे.

बंगळूरसह राज्यातील ड्रग्ज रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही खर्गे यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कर्नाटकाला अमली पदार्थमुक्त केले जाणार आहे. अमली पदार्थ कुठून व कसे येत आहेत? त्यामागील आर्थिक व्यवहार, अमली पदार्थांचे तस्कर, राज्यातील, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थांचा धोका यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

हे काम केवळ गृह विभागाकडून केले जाऊ शकत नाही. तर यासाठी जनता, संघटना व स्वयंसेवी संस्थांनी माहिती पुरवली पाहिजे. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विविध बंदरातून अवैध मार्गांनीच प्रामुख्याने हे अमली पदार्थ राज्यात येतात. ते बंदर कोणाचे आहे ? हे सर्व तपासणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news