Belgaum financial scam: घोटाळा आंतरराज्य; तपास सीआयडीकडे

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त : शिवम असोसिएटस्‌च्या गैरकारभाराची पाळेमुळे खोलवर
scam
ScamPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शिवम असोसिएटस्‌च्या गुंतवणूक कंपनीचा संचालक शिवानंद नीलण्णवरकडे याने केलेला कथित घोटाळा एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो अन्य राज्यांमध्येही पसरला असण्याची शक्यता आहे. हा घोटाळा ५० कोटींच्या वर असल्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महंमद रोशन व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, शिवम असोसिएटस्‌ची माहिती गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही जमा करत आहोत. मार्केट इंटिलिजन्स, पोलीस खाते, प्रांताधिकारी व सहायक निबंधक अशा अनेक विभागाकडून माहिती जमवून दोन दिवसांपूर्वी आपण प्रांताधिकारी श्रवण नायक यांना संस्थेच्या तपासाची सूचना दिली होती. त्यानुसार तपास करून प्रांताधिकारी, पोलीस खात्याने अहवाल तयार केला आहे. पोलीस आयुक्तांनी १५० पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये आरबीआय, सेबी (भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ), को-ऑपरेटिव्ह कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार ३५ हजार लोकांच्या ठेवी घेतल्या असून त्याचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. ठेवींचा उपयोग नेमक्या कोणत्या कारणासाठी केला जातो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news