Belgaum Heroin seized: नऊ लाखांचे हेरॉईन जप्त

शिंदोळीच्या युवका­ला अटक : सीसीबी पोलिसांची कारवाई
Belgaum Heroin seized: नऊ लाखांचे हेरॉईन जप्त
Published on
Updated on

बेळगाव : शहरात एकाकडून ९ लाख रुपये किमतीचे ४५ ग्रॅम हेरॉईन जप्त करत एकाला अटक केली. राघवेंद्र गोपाल मुर्कटनाळ (वय ३६, रा. गंगानगर, शिंदोळी, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

सदर तरुण शहरातील केएसआरटीसी जुने पार्किंग परिसरात अमली पदार्थ विकत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता त्याच्याकडे तब्बल ४५.१८ ग्रॅम हेरॉईन आढळून आले.

सध्याच्या बाजारभावानुसार याची किंमत ९ लाख रुपये होते. त्याच्याकडून हेरॉईन व ५०० रु. किमतीचा मोबाईल जप्त केला. या कारवाईत उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news