

धारवाड ः धारवाड तालुक्यातील येरीकोप्पा गावाजवळ कार अपघातातून पाच जण बालंबाल बचावले. कार तीन ते चार वेळा पलटी होऊनही प्रवासी सुखरुप बाहेर पडले. चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोन ते तीन वेळा पलटी झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यांनीच कारमधल्या लोकांना बाहेर काढून वाचवले. धारवाड ग्रामीण पोलीस अधिकारी तपास करत आहेत.