Belgaum municipal corporation: मनपाच्या पायऱ्यांवर नगरसेवकांचा ठिय्या

बैठकीवर बहिष्कार; विषयपत्रिकेत विरोधकांच्या विषयांना मिळेना जागा
Belgaum municipal corporation: मनपाच्या पायऱ्यांवर नगरसेवकांचा ठिय्या
Published on
Updated on

बेळगाव : नूतन महापौर प्रीती कामकर यांच्या उपस्थित पहिलीच बैठक शनिवार (दि. 18) महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. नाडगीत झाल्यानंतर विरोधी पक्षातील नगसेवकांसह सरकारनियुक्त सदस्यांनी आपण सुचवलेले विषय विषयपत्रिकेवर का नाहीत, असा सवाल करत गदारोळ करण्यास सुरुवात केली. महापौर, उपमहापौरांनी योग्य उत्तर न दिल्याने विरोधी गटासह सरकारनियुक्त नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घालत मनपा इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन छेडले.

महापालिका कार्यालयाच्या पायरीवर बसून हलगी वादन करुन विरोधी गटाने परिसर दणाणून सोडला. एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणाबाजी करत बैठकीचा निषेध केला. सद्या शहरात पाणी टंचाई महत्वाचा विषय आहे. हा विषयाबरोबर स्ट्रीट लाईट, रस्ते दुरुस्ती हे विषय सुचवूनदेखील ते अजेंड्यावर आले नाहीत. 10 एप्रिलरोजी बैठकीचा अजेंडा नगरसेवकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून देण्यात आला. त्यामुळे विरोधी गटनेत्यासह सरकारनियुक्त नगरसेवक आक्रमक झाले.

दुपारी शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बैठक संपेपर्यंत आंदोलन सुरुच राहिले. आंदोलनात रवी साळुंखे, दिनेश नाशीपुडी, रमेश सोंटकी, सिद्राय मेेस्त्री, बसवराज मोदगेकर, मलगौडा पाटील, शिवाजी मंडोळकर, विरोधी गटनेता मुजम्मल डोणी, अजीम पटवेकरांसह इतर नगरसेवक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news