Belgaum electricity shutdown: शहरासह तालुक्यात उद्या विजेला सुट्टी

वीजपुरवठा दिवसभर खंडित राहणार : हेस्कॉमकडून ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
Electricity
ElectricityPudhari
Published on
Updated on

बेळगाव : हेस्कॉम देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने रविवारी (दि. २४) शहर, औद्योगिक वसाहतींसह बेळगाव तालुक्यातील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खंडीत करण्यात येणार आहे.

शहरात शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कार रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस टॉकीज रोड, कॅण्टोन्मेंट, जेएल विंग, विजयनगर, ओमकारनगर, इंडाल, केव्हेंपूनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करिअप्पा कॉलनी, आश्रय कॉलनी, शिवाजी कॉलनी, मुनियार ले आऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, गोगटे कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर पहिला क्रॉस, गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, जैन इंजिनीअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स,

जनेश्र्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नमानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, उद्यमबाग पोलिस स्थानक परिसर, अनगोळ परिसर, यरमाळ रोड, माणिकबाग, देशपांडे हॉल, पृथ्वी मेटल, कामाक्षी इंजीनीअरिंग, मारुती मेटल, निर्मन नेतलकर, अशोक आयर्न, हिंदुस्थान इंजिनीअरिंग, दामोदर कंपाउंड, दोड्डण्णावर कंपाउंड, अरुण इंजिनीअर्स, एन. आर. पटेल कंपाउंड, शिवाजी हॉटेल, राघवेंद्र हॉटेल, गृहलक्ष्मी परिसर, जीआयटी कॉलेज, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर रस्ता, मच्छे रस्ता, पाटील माळ, राघवेंद्र हॉटेल परिसर, सुखशांती हॉटेल, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, नित्यानंद कॉलनी, गोडसेवाडी, बी. के. फौंड्री, विश्वकर्मा कॉलनी, जैतनमाळ परिसर,

ऑटोनगर, कणबर्गी, रामतीर्थनगर, मारुतीनगर, काकती, मुत्यानट्टी, बसवन कुडची, नेहरुरस्ता पहिला क्रॉस, आगरकर रोड दुसरा क्रॉस, पावर हाउस, राणा प्रताप रोड, रेल्वेगेट खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीरनगर, वड्डर गल्ली, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्‌स शेड रोड, मराठा कॉलनी, एस. जी. कॉलनी पहिले गेट, टिळक चौक, शिवभवन या भागात रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा ठप्प होणार आहे.

बेळगाव तालुक्यात मुचंडी, अष्टे, मारीहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्याळ, मावीनकट्टी, तारीहाळ, चंदनहोसूर, सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, खणगाव, चंदूर, चंदगड, गुंजेनट्टी, केदनूर, मण्णीकेरी, हंदिगनूर, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, अतवाड, बोडक्यानेट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी, निंग्यानट्टी, गुडगेनट्टी, गौंडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी, हिंडलगा, कंग्राळी के. एच. अलतगा, आंबेवाडी या गावात रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडीत होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news