Belgaum fuel supply: पेट्रोल, डिझेल पुरवठा साखळी सुरळीतच

कंपन्यांची ग्वाही : राज्यभर इंधन पुरेसे
Belgaum fuel supply: पेट्रोल, डिझेल पुरवठा साखळी सुरळीतच
Published on
Updated on

बेळगाव, बंगळूर : पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपत असल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या कोणत्याही भागात इंधनाची कमतरता नाही, असा दावा पेट्रोल आणि डिझेल पुरवठादार कंपन्यांनी केला आहे. आमच्याकडे कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि एटीएफचा (विमानाचे इंधन) मुबलक साठा आहे, असे भारत पेट्रोलियम कंपनीने म्हटले आहे, त्यामुळे राज्यात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पत्र कंपनीने सोशल मीडियावर प्रसारित केले आहे.

पुरवठा साखळ्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीतपणे कार्यरत आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पूर्णपणे कार्यरत असून अखंड इंधन पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये किंवा अनावश्यक खरेदी करू नये. इंधनाची उपलब्धता पुरेशी आहे, असे पत्रात म्हटले आहे.

पंपांवरील गर्दी ओसरली

सोमवारी सायंकाळी सोशल मीडियावरून पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे बेळगावमधील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सोमवार व मंगळवार दोन दिवसांत 2 लाख लिटर पेट्रोलची विक्री झाल्याची माहिती मिळाली. मात्र, बुधवारी ही गर्दी ओसरली. ग्रामीण भागातील काही पंपांना पुरवठा न झाल्याने काही पंप बंदच होते. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजीची समस्या उद्भवल्यास नागरी पुरवठा विभागाकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून ग्राहक आपल्या तक्रारी थेट करू शकतात. 0831-24077280 ही हेल्पलाईन जारी केली आहे. पेट्रोल व डिझेलच्या समस्येबाबत 112 ही हेल्पलाईन जारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news