Aadhaar card update: आधार अपडेटसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला
Aadhaar card
Aadhaar cardfile photo
Published on
Updated on

बेळगाव : राज्यातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या वयोगटातील सर्व मुलांच्या आधार अपडेटसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलली आहे. राज्यातील सर्व आधार सेवा केंद्रांवर ही सेवा मोफत दिली जाणार आहे.

बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांनी मुलांचे आधार कार्ड व संबंधित कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन सर्व माहिती अपडेट करावी. जिल्हा प्रशासनाने सर्व पालकांना ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करावी. मुलांचे आधारकार्ड बायोमेट्रिक केल्यामुळे विविध सरकारी, शैक्षणिक सुविधा मिळविणे सोपे होईल.

शाळेत प्रवेश घेणे, स्पर्धा परीक्षांना बसणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, शिष्यवृत्ती आदीसाठी बायोमेट्रिक पद्धतीने आधार क्रमांक अपडेट असणे गरजेचे आहे, असे कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news