Mohammad Azharuddin | मला ‌‘रन आऊट‌’ करू नका : अझरुद्दीन

बागलकोट, दावणगिरीसाठी आज मतदान
Mohammad Azharuddin
Mohammad AzharuddinPudhari File Photo
Published on
Updated on

बेळगाव : मला या खेळीत रन आऊट करू नका, अशी कोपरखिळी लगावत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी मंगळवारी दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी झाल्यानंतर बुधवारी नेत्यांनी घरोघरी प्रचार केला.

या मतदारसंघासह बागलकोट पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी 9 रोजी मतदान होत आहे. दोन्ही जागा काँग्रेसकडेच होत्या. दोन्ही आमदारांच्या मृत्यूमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दावणगिरी दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार समर्थ श्यामनूर आणि भाजपचे श्रीनिवास दास करियप्पा, तर बागलकोटसाठी काँग्रेसचे उमेश मेटी आणि भाजपचे वीरण्णा चरंतीमठ यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

प्रचारात दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाग घेतला होता. दोन्ही निवडणुकांचे निकाल काँग्रेसच्या राज्यातील सत्तेवर थेट परिणाम करणार नसले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांचा कल कोणत्या बाजूने आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news