

संबरगी : अथणी-हारुगिरी रस्त्यावर संकोणहट्टीजवळ चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून विकास कोष्टी (वय 16, रा. आरळहट्टी, ता. अथणी) याला बेदम मारहाण त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अथणी-हुलगबाळी रस्त्याकडेला टाकण्यात आला होता. याबाबत 6 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित अब्दुलबारी मुल्ला (वय 36, रा. अथणी), जुबेरअहमद मौलवी (वय 34, रा. अथणी), बिलालअहमद मौलवी (वय 25, रा. अथणी), हजरतबिलाली नालबंद (वय 24, रा. अथणी), फय्यूम नालबंद (वय 27) व महेश काळे (वय 36, रा. अथणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
1 मे रोजी हुलगबाळी सदर घटना उघडकीस आली होती. संशयितांनी शेतातील शेडमध्ये नेऊन त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अज्ञातस्थळी फेकून दिला होता. पोलिसांनी संशयितांना न्यायालयासमोर हजर केल्यावर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस प्रमुख आर. बी. बसरगी, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हळूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार हडकर, मल्लिकार्जुन तळवार यांच्यासह कर्मचार्यांनी संशयितांना गजाआड केले.
या कारवाईसाठी सहाय्यक उपनिरीक्षक वाय. वाय. रामोजी, एम. बी. दोडमनी, एम. ए. पाटील, ए ए. येरकर, एम. डी. हिरेमठ, सी. व्ही. गायकवाड, डी. वाय, मन्नापूर, जी. एस. डांगे, एस. सी. पुजारी, एस. एस. बबलेश्वर, सचिन पाटील, एस. बी. ढवळेश्वर, एम. बी. दरीगौडर यांच्यासह कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.