Athani prostitution racket: अथणी तालुक्यात वेश्या व्यवसाय उघड

लॉजमालकासह दोघांना अटक
Prostitution Case
Prostitution CasePudhari
Published on
Updated on

संबरगी : अथणी तालुक्यातील बळीगेरी गावाबाहेरील एका लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकून अवैध वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात लॉजमालकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

बळीगेरी गावाच्या हद्दीतील प्रशांत हॉटेल अँड लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अथणी पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यावेळी एका महिलेची सुटका करण्यात आली. रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सरदार भगवंत कांबळे (लॉजमालक, रा. बळिगेरी) व प्रवीण बसवराज मालदारी (रा. चडचण, सध्या अथणी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत हळ्ळूर, उपनिरीक्षक आरती तेली, कर्मचारी बी. आर. पाटील, बी. वाय. मन्नपूर, एस. बी. खोत, अंगणवाडी सेविका मीनाक्षी मुदासी यांनी भाग घेतला.

अथणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिरिमल्लाप्पा उप्पार यांनी गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा (आयटीपी कायदा, 1956) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news