

चिकोडी : कारने चिरडल्याने 10 वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी अथणी शहरात घडली. अगस्त्य विजयकुमार कंकणवाडी (वय 10, रा. रडेरट्टी, ता. अथणी) असे मुलाचे नाव आहे.
रस्त्याच्या बाजूने चालत जात असताना त्याला मागच्या बाजूने कारने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर चालक फरारी झाला होता. सीसीटीव्हीतील फुटेज पाहून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. राहुल सुरेंद्र हुंडेकर असे त्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.