Karnataka education: अतिथी शिक्षकांची नियुक्ती करा; राज्यभरात ६० हजार जागा रिक्त

अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघातर्फे करण्यात आली
Teacher Recruitment
Teacher Recruitment(Pudhari file photo)
Published on
Updated on

बेळगाव : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून अनेक शाळांतून जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या मुख्य सचिव रश्मी व्ही. महेश यांच्याकडे गुरूवारी तशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

येत्या शैक्षणिक वर्षाला २९ मेपासून प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण खात्याने प्राथमिक शाळेसाठी ५०,००० आणि माध्यमिक शाळांसाठी १०,००० अतिथी शिक्षकांची निय़ुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यभरात ४५ हजाराहून अधिक शिक्ष पदे रिक्त आहेत.

गत वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी अतिथी शिक्षकांची यादी तयार केली होती. त्याचप्रमाणे यंदाही त्याच अतिथी शिक्षकांची फेरनियुक्ती करावी, अशी मागणीही शिक्षक संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news