

निपाणी : जोल्ले एज्युकेशन सोसायटीने एकसंबा, निपाणी व बंगळूर येथे विविध 14 कोर्स सुरू करून शिक्षणाची सोय केली आहे. विशेषत: चिकोडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सामान्य, शेतकर्यांच्या मुलांना जेईई व नीटचे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळावे, यासाठी निपाणी येथे अण्णासाहेब जोल्ले पीयु इंडिपेंडेंट कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी सांगितले.
जोल्ले एज्युकेशन सोसायटीच्या अण्णासाहेब जोल्ले पीयु इंडिपेंडेंट कॉलेजच्या हॉस्टेलचे उद्घाटन बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रिया जोल्ले व यशस्विनी जोल्ले यांची उपस्थिती होती.
बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, विद्यार्थी व विद्यार्थिनींना राहण्याची सोय होस्टेलमध्ये करण्यात आली आहे. यंदा कॉलेजच्या पहिल्या अकॅडमिक वर्षात 220 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आज स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शशिकला जोल्ले स्कॉलरशिपमधून 60 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च केले जाणार आहेत. यावर्षी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून परीक्षा घेऊन गुणवत्ता प्राप्त 20 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली. यावेळी विजय राऊत यांच्यासह शिक्षक पालक उपस्थिती होती.