Belgaum Accident: दुचाकीला धडकून खासगी बस उलटली

दुचाकीस्‍वाराचा मृत्यू : बिळगी क्रॉसजवळील घटना
Belgaum Accident: दुचाकीला धडकून खासगी बस उलटली
Published on
Updated on

अंकली : हुबळी–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिळगी क्रॉसजवळ खासगी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली तर दुचाकीस्‍वार ठार झाला हा. अपघात बुधवारी झाला. अमरसिद्ध कांबळे (वय ३४) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आराम बस हुबळी–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना बिळगी क्रॉसजवळ दुचाकीला जोरदार धडकली. धडकेनंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये सुमारे १५ ते २० प्रवासी असल्याचे समजते. या अपघातात दुचाकीस्वार अमरसिद्ध कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बसमधील इतर प्रवाशांच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच बागलकोट जिल्हा पोलिस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news