‌DK Shivakumar | ‘अलमट्टी‌’, ‌‘म्हादई‌’साठी खासदारांशी चर्चा : डीके

राज्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती खासदारांना देऊन आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नेण्यात येईल
‌DK Shivakumar
‌DK ShivakumarPudhari
Published on
Updated on

बंगळूर : अलमट्टी तसेच म्हादई आणि कावेरीसह राज्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती खासदारांना देऊन आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

प्रश्नोत्तराच्या तासात गुरुवारी आमदार थिप्पनप्पा कनकनूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, येत्या सोमवारी उद्योगमंत्री एम. बी. पाटील आणि कायदामंत्री एच. के. पाटील यांच्यासोबत नवी दिल्लीला रवाना होत आहेत. तेथे ते राज्यातील खासदारांना भेटतील. राज्यातील सिंचन प्रकल्पांसमोरील समस्या, केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या मंजुऱ्या इत्यादींबद्दल त्यांना माहिती देतील. त्या मंजुऱ्या मिळवण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतील. कृष्णा अप्पर रिव्हर प्रकल्पासह प्रमुख सिंचन प्रकल्पांबाबत न्यायालयात सक्षम युक्तिवाद करण्यासाठी वकिलांची एक वेगळी टीम तयार केली जाईल.

जलसंपदा विभागाच्या कृष्णा जलभाग्य महामंडळ आणि कर्नाटक सिंचन महामंडळाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अपील दाखल केले आहे. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व प्रकरणांना विलंब माफ झाल्याने युक्तिवाद करण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news