Almatti Dam: अलमट्टी पाणीसाठा ६३ टक्क्यांवर

मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे
Almatti Dam
Almatti Dam
Published on
Updated on

विजापूर : मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

शनिवार, ११ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ७७.५९० टीएमसीवर पोहोचला आहे. हा धरणाच्या एकूण क्षमतेच्या ६३.०४ टक्के इतका आहे. मागील १० तासांतील धरणात येणाऱ्या पाण्याची सरासरी आवक १ लाख ६९ हजार ३०६ क्युसेक इतकी होती. त्याच कालावधीत सरासरी ४२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

अलमट्टी धरणाची पूर्ण जलसाठा क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news