

बेळगाव : भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात अक्का कॅफे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक आढावा घेणारी बैठक शुक्रवारी (दि. 10) जिल्हा पंचायत सभागृहात झाली. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे अध्यक्षस्थानी होते. बेळगावचे उपवनसंरक्षक क्रांती एन. ई. व्यासपीठावर होते.
भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात अक्का कॅफे सुरु करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अक्का कॅफे इमारतीची रचना पर्यटकांना आकर्षित करणारी असावी. जंगलाचे स्वरुप प्रतिबिंबित करणारी असावी.
यासाठी तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी तयारी करावी. संजीवनी वक्कुटच्या माध्यमातून याचे नियोजन करावे, अशी सूचना सीईओ शिंदे यांनी केली.
संजीवनी वक्कुटच्या महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना संधी देण्यात यावी, असे जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारप्पण्णावर यांनी सांगितले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.