न्यायव्यवस्थेत पारदर्शकतेसाठी यंत्रणा हवी

अधिवक्ता परिषदेची मागणी :जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्रीय कायदामत्र्यांना निवेदन
Judicial transparency India
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देताना अधिवक्ता परिषदचे पदाधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या घटनांमुळे न्यायव्यवस्थेबाबत सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवण्याची मागणी अधिवक्ता परिषदच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन केंद्रीय कायदामंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना गुरुवार दि. 24 रोजी देण्यात आले.

न्यायाधीशांचे नातेवाईक विविध न्यायालयामध्ये वकील किंवा इतर कर्मचारी म्हणून सेवा बजावतात. त्यांच्या खटल्याचा निकाल वेगळाच लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी अशा न्यायाधीशांची तातडीने इतरत्र बदली करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. न्यायालयीन नियुक्ती आणि देखरेखीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच या प्रक्रियेत न्यायपालिकेची महत्त्वाची भूमिका सुनिश्चित करण्यासाठी नवीन कायदे त्वरित आणले पाहिजेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अधिवक्ता परिषदचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश बगली, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. शिवराज नसलापुरे, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. डी. डी. पाटील, राज्य जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. सचिन शिवण्णावर, अ‍ॅड. संतोष शिवापूर, अ‍ॅड. जयश्री मड्रोळी यांच्यासह वकील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news