फुटपाथवर दुचाकी? मग दंड भरा की !

फुटपाथवर दुचाकी? मग दंड भरा की !
फुटपाथवर दुचाकी? मग दंड भरा की !
फुटपाथवर दुचाकी? मग दंड भरा की !pudhari photo

बेळगाव : नियमबाह्य दुचाकी नंबर प्लेटवर कारवाई करत असतानाच रहदारी पोलिस नो पार्किंग व दुभाजकावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत. गुरुवारी (दि. २७) कॉलेज रोडवर सकाळपासून नो पार्किंग व दुभाजकावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

लिंगराज कॉलेजच्या आवारात दुचाकी पार्किंग करण्यास कॉलेज व्यवस्थापकाने बंदी घातल्याने कॉलेजरोडवर दुचाकींची गर्दी होत आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी दुचाकी लावल्या जातात. रहदारी पोलिसांनी नियम बाह्य नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला. आता नो पार्किंग व दुभाजकावर पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकींना लक्ष्य केले जात आहे.

गुरुवारी कॉलेजरोडवर लावण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यांना लॉक लाऊन दंडात्मक कारवाई केली. लॉक लावलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबर चालक परवाना, हेल्मेट, गाडीची सद्याची परिस्थिती तपासण्यात आली. गाडीचे इन्शुरन्स न भरलेले दुचाकीस्वार देखील कारवाईत अडकले. यापूर्वी दुचाकी उचलून त्या पोलिस स्थानकात ठेवण्यात येत होत्या. मात्र आता कॅम्प पोलिस स्थानकात दुचाकी ठेवण्यास जागा नसल्याने त्या ठिकाणी दुचाकीला लॉक लावून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news