Freight transport revenue: मालवाहतुकीतून 8,550 कोटींचा महसूल

नैऋत्य रेल्वेची कामगिरी; वर्षभरात 4.25 दशलक्ष टन मालवाहतूक
Freight transport revenue
Freight transport revenuePudhari
Published on
Updated on

धारवाड : नैऋत्य रेल्वेने वर्षभरात 4.25 दशलक्ष टन मालवाहतूक करुन त्यातून 8,550 कोटीचा महसूल मिळवला आहे. तर प्रवासी वाहतुकीतून 4,876 कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली.

नैऋत्य रेल्वेच्या मालवाहतूक आणि प्रवासी महसुलात फेब्रुवारी 2025 ते 2026 पर्यंतच्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. मालवाहतूक महसूल हा रेल्वेचा प्रमुख उत्पन्न स्त्रोत बनला आहे. मालवाहतुकीत वर्षभरात 8,550 कोटी महसूल मिळवला. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 14.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मालवाहतूकीतून 780 कोटींचा एकूण महसूल मिळवला. गतवर्षी फेब्रुवारीत मिळालेल्या महसुलापेक्षा तो 7.25 टक्के अधिक आहे. महिनाभरात लोहखनिज 19 टन, स्टील 9.8 टन, कोळसा 9.3 टनपर्यंत झाले आहे. अन्नधान्य, कंटेनर आणि खतांच्या वाहतुकीतही सातत्याने सुधारणा होत आहे.

वर्षभरात 13.6 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केल्याने प्रवासी वाहतुकीतून 4,876 कोटींवर उत्पन्न मिळाले आहे. ही आकडेवारी गतवर्षीपेक्षा 18.27 टक्क्यांनी अधिक आहे. सणासुदीच्या काळातील प्रवासी महसूल 3,154 कोटींवर पोचला आहे. गतवर्षीपेक्षा 9.25 टक्के वाढ नोंदवते. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट तपासणी दरम्यान करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून 6.32 कोटी रुपयांची भर पडली आहे, असे डॉ. कनमाडी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news