कानडी प्रशासनाकडून मुस्कटदाबी सुरूच; 1 नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्हाबंदी

कानडी प्रशासनाकडून मुस्कटदाबी सुरूच;  1 नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्हाबंदी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : 1 नोव्हेंबर काळ्या दिनी मराठी जनतेच्या निषेध फेरीत आणि जाहीर सभेत सहभागी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि 30) महाराष्ट्राचे मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावर बेळगाव जिल्हा बंदी घोषित केली आहे. जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी रात्री हा आदेश बजावला आहे.

मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री आहेत. तर खासदार धैर्यशील माने हे तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाला हे मंत्री उपस्थित राहून सीमाभागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतील, त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिकांत संघर्ष निर्माण होईल, यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यन्त ही बंदी असणार आहे, असे नोंद करण्यात आले आहे. म. ए. समितीच्या काळ्या दिनाच्या फेरीला आणि जाहीर सभेला या मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवू नये, असे सूचित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news