बेळगावात खून प्रकरणी जन्मठेप – घरासमोर कुंकू, लिंबू टाकल्याच्या कारणाने केला होता खून | पुढारी

बेळगावात खून प्रकरणी जन्मठेप - घरासमोर कुंकू, लिंबू टाकल्याच्या कारणाने केला होता खून

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : यल्लापूर येथील खून प्रकरणातील आरोपी लगमना सनदी याला आज (दि. १८) जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, लगमना सोमलिंग सनदी (वय 42 रा. के.यल्लापूर ता हुक्केरी) 2018 साली झालेल्या मल्लिकार्जुन सुभाष कम्मार (वय 27  रा.के यल्लापूर) याचा खून प्रकरणी अटकेत होता. सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि. १८) आरोपी लगमना सोमलिंग सनदी (वय 42 रा.के.यल्लापूर ता हुक्केरी) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणी यमकनमरडी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पीएसआय बी एस तळवार व हुक्केरी सीपीआय एस पी मुरगोड यांनी गुन्हा दाखल करून, आरोपीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एल चव्हाण यांनी आरोपी लगमणा सनदी याला 21 हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारच्या बाजूने सरकारी वकील वाय बी तूंगळ यांनी युक्तिवाद केला.

२०१८ साली मलिकार्जुन याचा खून

दि 29 जून 2018 साली मल्लिकार्जुन सुभाष कम्मार याचा खून झाला. लगमना याने शिवीगाळ केल्याने आणि घराकडे कुंकु व लिंबू टाकत असल्याच्या रागातून लिंगमना याने कम्मार याचा खून केला होता. कम्मार यांच्या मानेवर आणि पोटावर कुऱ्हाडीने वार केले होते. यावेळी सोडवण्यासाठी आलेले मयत मल्लिकार्जुन याचे वडील सुभाष कम्मार व नातेवाईक भिमराय निंगाप्पा कम्मार यांच्यावर देखील खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

Back to top button