पोलिसांना घाबरून कृष्णा नदीत उडी मारल्याने ६ जणांचा मृत्यू; जुगार खेळताना पोलिसांची धाड, विजापुरातील घटना

तिघांचे मृतदेह सापडले तर तीन बेपत्ता
The search for the drowned people is still going on.
बुडालेल्या लोकांचे शोधकार्य अजूनही सुरु आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

काशिनाथ सुळकुडे, चिकोडी |मधुकर पाटील, निपाणी

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा : विजापूर जिल्ह्यातील कोल्हार येथे जुने बळोती नजीक कृष्णा काठावर जुगार खेळणाऱ्या गटावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी नदीमार्गे पळ काढत गोलाकार बोटीत बसून 8 जण जात होते. यामध्ये पोहायला येत नसल्याने त्यातील जणांचा आरोपींचा बुडून मृत्यू झाला, तर 2 वाचल्याची माहिती समोर आली आहे. मरण पावलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले तर तीन बेपत्ता आहेत.

कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार (वय 30), तयब चौधरी (वय 42), रफिक जालगार उर्फ बांदे (वय 55), पुंडलिक मल्लाप्पा यंकंची (वय 36), दशरथ गौडर सूळीभावी (वय 66) असे मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत. तर आणखीन एका मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अग्निशमन दल व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

The search for the drowned people is still going on.
यवतमाळ : हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अशी घडली घटना :

सहा जणांचा गट नदीकाठावर जुगार खेळत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर कोल्हार पोलीस पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदी काठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला. नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली. पोहता येत नसल्याने सर्वजण पाण्यात बुडून मरण पावल्याचे दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. यावेळी कुटुंबाने हंबरडा फोडला. रात्र रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. यावेळी जमलेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घडविण्यासाठी कोल्हार पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

बुधवारी एनडीआरएफ पथकाने बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला. यामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर इतर दोघेजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून उद्या गुरुवारीही शोध मोहीम सुरूच राहणार आहे.
अतिरिक्त जि.पो.प्रमुख शंकर मारीहाळ

जुगार अड्ड्यावर 17 जण खेळत होते

नदीकाठावर एकूण 17जण जुगार खेळत होते. ही घटना समजल्यानंतर विजयपूर पोलीस ठाण्याचे जि.पो.प्रमुख ऋषिकेश सोनवणे अतिरिक्त जि.पो.प्रमुख रामनगौडा हट्टी, शंकर मारीहाळ यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी बाळाप्पा नंदगावी,सीपीआय अशोक चव्हाण यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने जुगार खेळण्याऱ्याचा पाठलाग केला. यावेळी सर्वजण भितीपेटी पळत सुटले. यावेळी पोलिसांच्या भीतीने पाच लहान होडीतून जात असताना ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news