जैनमुनी हत्या प्रकरण सीआयडीला हस्तांतर; विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा | Jain muni murder case | पुढारी

जैनमुनी हत्या प्रकरण सीआयडीला हस्तांतर; विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा | Jain muni murder case

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैनमुनी आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीला हस्तांतर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

आज (दि. १९) बंगळूर येथे होत असलेल्या कर्नाटक विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले जैनमुनी हत्या प्रकरणाची आणखी चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीला देत आहे.

जैन मुनी खून प्रकरणी यापूर्वी नारायण माळी व हसन दालायत या दोन आरोपींना अटक केली असून, चिकोडी डीवायएसपी बसवराज यलिगार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आज (दि. १९) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीआयडीकडे तपास हस्तांतर करणार असल्याचे सांगितल्याने पुढील काळात अणखीन चांगला तपास होणार आहे.

भाजपच्या मागणीपुढे सरकार नमले. जैन मुनीचा निर्घृण खून करण्यात आला असून हे कृत्य केवळ दोघांकडून होणे अशक्य आहे। यामागे अनेकांचे हात असून, खरे सत्य बाहेर यावे अशी मागणी करत, सदर प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याची मागणी भाजपचे अनेक नेत्यांनी केला. तसेच याविषयी सभागृहात भाजपने आवाज उठविला होता. कर्नाटक पोलिस सक्षम असताना सीबीआय का अशी भूमिका राज्य सरकारची होती. सीबीआयच्या बदल्यात सीआयडीकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारचा निर्णय हा भाजपच्या दबावामुळे घेतला का याचीच चर्चा सुरू आहे.

Back to top button