Agniveer: सांबरा येथे दिमाखात दीक्षांत समारंभ; २ हजार ६७५ अग्नीवीर देशसेवेत दाखल | पुढारी

Agniveer: सांबरा येथे दिमाखात दीक्षांत समारंभ; २ हजार ६७५ अग्नीवीर देशसेवेत दाखल

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून 2 हजार 675 अग्नीवीर (Agniveer) वायूदलात दाखल झाले आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज (दि.3) दिमाखात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल आर. राधीश, (एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ट्रेनिंग कमांड, इंडियन एअर फोर्स) उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अग्नीवीर (Agniveer) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या जवानांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. अग्निपथ योजनेंतर्गत पहिले अग्निवीर वायू प्रशिक्षण 30 डिसेंबर 2022 रोजी एअरमन ट्रेनिंग स्कूल सांबरा येथे सुरू झाले. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय हवाई दलाने महिला उमेदवारांसाठीही आपले दरवाजे उघडले आहेत. त्यांचे प्रशिक्षण 28 जून 2023 पासून एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे सुरू होणार असल्याची माहिती दीक्षांत समारंभात देण्यात आली.

वायू दलात 3 हजार जागा भरण्यात येणार होत्या. त्यासाठी देशभरातून 7 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या जवानांना देश सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे एअर मार्शल आर. राधीश यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button