बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, बेळगाव सीमा भागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म.ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल (दि. ४) टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर आज खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. यावेळी म.ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आणि जोरदार घोषणा करून निषेध व्यक्त केला. दरम्यान घोषणा देत असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा