भाजपला बहुमताचा विश्वास : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई | पुढारी

भाजपला बहुमताचा विश्वास : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे संघटन मजबूत आहे आणि कार्यकर्ते दक्ष व तत्पर आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळण्याचा पूर्ण विश्वास आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत स्पर्धा असणे स्वाभाविक आहे. आमचा पक्ष पक्षाचे नेते तसेच हायकमांड यासाठी समर्थ आहेत. हायकमांडकडून ज्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल. आसाम आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय नेते राज्याला भेट देणार आहेत.
काँग्रेस पक्ष सत्तेत येणार नसल्याने गॅरंटी योजनेचा गवगवा करण्यात येत आहे. ही योजना जनतेची फसवणूक करण्याशिवाय दुसरे काही नाही.

Back to top button