तिकिट दिल्यास 'उत्तर' मधून लढणार : महांतेश कवटगीमठ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मला पक्षाने तिकिट दिले तर बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. इतके दिवस जिल्ह्याचे राजकारण करत आहे, त्यामुळे येथील सोशल इंजिनिअरींग मला चांगलेच माहिती आहे. पण, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रीया विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केली.
सोमवारी (दि. १३) पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी पक्षाकडे बेळगाव उत्तर किंवा चिकोडी येथून निवडणूक लढवणार आहे, असे सांगितले नाही. योग्य वेळी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.