बंगळूर : विधानसभा निवडणूक तयारीला वेग | पुढारी

बंगळूर : विधानसभा निवडणूक तयारीला वेग

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आवश्यक कामांचा निपटारा करण्याच्यादृष्टीने कामे हाती घेतली आहेत. २२४ विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

विविध खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी तसेच तहसीलदार व इतर आधिकाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी १.३ लाख शाईच्या बाटल्या तयार करण्याच्या सूचना निवडणुकीवेळी मतदारांच्या बोटांना शाई लावण्यासाठी तयार ठेवण्याची सूचना निवडणूक आयोगाने म्हैसूर येथील पुरवठादारांना केली आहे. मतदारयाद्यांची छाननी सुरू असून, अंतिम मतदारयादीच्या आधारावर शाईच्या मागणीनुसार पुरवठा केला जाणार आहे.

Back to top button