बेळगाव शहर परिसरातील शिवारात मद्यपींचा उच्छाद; ओल्या पाट्र्यांचे प्रकार | पुढारी

बेळगाव शहर परिसरातील शिवारात मद्यपींचा उच्छाद; ओल्या पाट्र्यांचे प्रकार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरालगतच्या शिवारातून मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. ओल्या पाट्यांचे प्रकार सुरू असून यामुळे शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे शिवारातील शेतकरी त्रस्त बनले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतातून रात्री ८ ते ११ पर्यंत दारू, गांजा, सिगारेट, जुगार, वाढदिवस व पाट करण्याचे प्रकार सुरू आहेत. शेतात बसून पाट करण्यात येतात. मद्यपान केले जाते. लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून गवत गंजीच्या आडोशाला बसून दारुच्या काचेच्या, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तसेच मांसाहारी खाद्यपदार्थावर ताव मारला जातो.

पार्टीनंतर रिकाम्या बाटल्या फोडण्यात येतात. त्याच्या काचा शिवारात पडतात. सिगारेट, गांजा, अफिम ओढत नशा चढल्यावर पेटता सिगारेट बोटात धरुन गंजीच्या दिशेने उडवतात. काहीजण गवत गंजीजवळ पेटते सिगारेट टाकतात. त्यातून गवत गंजी जळून जाण्याच्या घटना घडतात.

अशा प्रकारातून शहापूर तलावाशेजारील दोन भाताच्या, पाच गवताच्या गंजी एकाच रात्री जळाल्या आहेत. अशा घटनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मद्यपीं आणि शेतातून पार्टी करणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.

पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा

मद्यपी, जुगारी शिवारांचा आसरा घेत आहेत. याचा फटका शहराजवळच्या शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी शिवारांमध्ये धुडगूस घालणाऱ्यांवर त्वरित कारवाई अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

Back to top button