बंगळूर : परिवहन कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यभर धरणे | पुढारी

बंगळूर : परिवहन कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यभर धरणे

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन कर्मचाऱ्यांचे मंगळवारी (दि. २४) एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आहे. त्यामुळे बससेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने गेल्या सहा वर्षांपासून वेतनवाढ दिली नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. केएसआरटीसी स्टाफ अँड वर्कर्स फेडरेशन, अखिल कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचारी, एस. टी. एम्प्लॉईज युनियन, क.रा.र. सा. संस्था अनुसूचित जमातीतील अधिकारी व कल्याण संघांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे नेते अनंत सुब्बाराव आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. परिवहन महामंडळाच्या चारही विभागांच्या कार्यालयांसमोर धरणे धरण्यात येणार आहेत. एप्रिल २०२१ मध्ये परिवहन कर्मचाऱ्यांनी १५ दिवस संप पुकारला होता. दर चार वर्षांनी वेतनवाढ करण्याचा नियम आहे. पण, सहा वर्षे झाली तरी सरकारने वेतनवाढीकडे दुर्लक्ष केले आहे.

Back to top button