बेळगाव : रेशनचा २२ क्विंटल तांदूळ जप्त | पुढारी

बेळगाव : रेशनचा २२ क्विंटल तांदूळ जप्त

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  रेशनचा तांदूळ बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करून दोन वाहने जप्त केली. त्यांच्याकडून २२ क्विंटल तांदूळ जप्त केला असून याची किंमत एक लाख रूपये होते. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास हलग्याजवळ हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.

हलग्याहून कोल्हापूरकडे रेशनचा तांदूळ बेकायदेशीररित्या जात असल्याची माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तांदळाची वाहतूक ट्रक व एका मिनी मालवाहू टेम्पोतून होत असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला दिली. ट्रकमधील १५ क्विंटल तर टेम्पोतील १७ क्विंटल असा २२ क्विंटल तांदूळ जप्त केला.

याबाबतची फिर्याद अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक सतीश बेनगी यांनी दिली. त्यानुसार सदानंद लक्ष्मण पाटील (रा. कोल्हापूर) व यल्लाप्पा भीमशाप्पा बंडगी (रा. मरीकट्टी, ता. बैलहोंगल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिरेबागेवाडीचे उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प तपास करीत आहेत.

Back to top button