निपाणी : यमगर्णीजवळ ट्रक उलटून दोघे गंभीर | पुढारी

निपाणी : यमगर्णीजवळ ट्रक उलटून दोघे गंभीर

निपाणी : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णीजवळ चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाल्याने चालक क्लीनर दोघेजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसांत झाली आहे.

बंगळूर येथून ट्रक गुजरातकडे जात असताना पुढे निघालेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. दरम्यान, यावेळी बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. रस्ते देखभाल जयहिंद कंपनीचे निरीक्षक अमोल नाईक यांनी कर्मचार्‍यांसह वाहतूक सुरळीत करून दिली.

Back to top button