Gold theft: 25 तोळे सोन्याचे दागिने लंपास

बेडकिहाळमधील घटना : कुलूप तोडून घरात प्रवेश, परिसरात भीतीचे वातावरण
Gold theft |
Gold theft: 25 तोळे सोन्याचे दागिने लंपास(Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेडकिहाळ : येथील देसाई मळा परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 25 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

देसाई मळा परिसरात सरोजनी हिंदुराव देसाई, संजू हिंदुराव देसाई यांचे घर असून गणेशोत्सव साजरा करून देसाई कुटुंब नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या सावंतवाडीला गेले. गुरुवारी रात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिसर्‍या खोलीत असलेल्या तिजोरीचे लॉकर तोडून डब्यातील सोन्याचे दोन तोडे, चार बांगड्या, एक पाटली, एक तीन पदरी हार, नेकलेस, अंगठी, एक चेन, कोल्हापुरी साज असे सुमारे 25 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले.

शुक्रवारी सकाळी संजू देसाई यांच्या मुख्य दरवाजाला एक हिरवे कापड बांधल्याचे गल्लीतील नागरिकांना निदर्शनास आले. घराचे कुलूप तोडून चोरीची घटना घडल्याचे लक्षात आल्यावर शेजारील नागरिकांनी तत्काळ संजू देसाई व सरोजनी देसाई यांना कळविले. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहाय्यक कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. दुपारी संजू देसाई व त्यांच्या आई सरोजनी देसाई आल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे उघड झाले. काही अंतरावर असलेल्या अलगुरे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला. पण चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुले, उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी बेळगावहून श्वानपथकाला पाचारण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news