सौंदत्तीत मुसळधार पाऊस

सौंदत्तीत मुसळधार पाऊस
सौंदत्तीत मुसळधार पाऊस

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा सौंदत्ती यल्‍लम्मा देवस्थान परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाणीच पाणी झाले. देवस्थान आवारात पाणी तुंबून राहिल्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागला. मान्सून अजून सक्रीय नसला तरी गुरुवारी (दि. 16) दुपारी अचानकपणे सौंदत्ती यल्‍लम्मा देवस्थान परिसरात जोराचा पाऊस झाला. डोंगर भागात झालेल्या पावसाचे पाणी मंदिर आवारात तुंबून राहिले. मंदिराच्या व्हरांड्यापर्यंत पाणी तुंबले होते. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गैरसोयीचा त्रास सहन करावा लागला. अनेक भाविकांनी मंदिराच्या आवारात आसरा घेतला होता. प्रशासकीय मंडळाचे कर्मचारी तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी संध्याकाळपर्यंत काम करत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news