बेळगाव : जावयाने सासूवर चाकू हल्‍ला करुन घर पेटवले | पुढारी

बेळगाव : जावयाने सासूवर चाकू हल्‍ला करुन घर पेटवले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर चाकू हल्‍ला करुन घर पेटवल्याची घटना कंग्राळी बुद्रूक येथील नेताजी गल्‍ली येथे घडली.अग्‍नीशामक दलाच्या जवानानी आग आटोक्यात आणली. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली आहे. कौटुंबिक कारणातून जावयाने भांडण काढून मुलांना जबर मारहाण केली. घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून घरातील साहित्याची मोडतोड केली.

इतक्यावरच न थांबता मुलांना मारहाण करताना सासूने अडवण्याचा प्रयत्न केल्याने सासूवरही चाकू हल्‍ला करण्यात आला. यानंतर जावयाने पेट्रोल ओतून घरात आग लावली. यात कपडे व इतर साहित्य जळाले. गॅस पेटविण्याचा प्रयत्नही केला. घराला आग लागल्याची माहिती शेजारच्या नागरीकानी अग्‍नीशामक दलाला दिली. अग्‍नीशामक दलाचे ठाणाधिकारी व्ही.एस. टक्केकर व त्यांच्या सहकार्‍यानी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. काकती पोलिस निरीक्षक गुरुनाथ एस., उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास हाती घेतला आहे.

Back to top button