बेळगाव : समितीच्या 31 नेत्यांना जामीन मंजूर | पुढारी

बेळगाव : समितीच्या 31 नेत्यांना जामीन मंजूर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठी कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात म. ए. समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी परवानगी घेतली नाही, असा ठपका ठेवत दाखल गुन्ह्याच्या सुनावणीत 31 जणांना जामीन मंजूर झाला. पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने घटनात्मक तरतुदीनुसार सीमाभागातील मराठी जनतेला मराठीतून सरकारी कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

पण, धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, समिती कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि मोर्चाचा निर्धार कायम ठेवला. त्यानुसार मोर्चा काढण्यात आला. पण, मोर्चाला परवानगी घेतली नाही, कोरोना नियमावलींचे पालन केले नाही, असा ठपका ठेवत कॅम्प पोलिसांनी 31 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. या खटल्याची सुनावणी पाचवे दिवाणी न्यायालयात झाली.

मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, किरण गावडे, रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, नगरसेवक रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, बंडू केरवाडकर, गजानन पाटील, संदीप चौगुले, दिगंबर काटकर, परेश शिंदे, विनायक सांबरेकर, हणमंत मजुकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील, कृष्णा गुरव न्यायालयात उपस्थित होते.

जामिनासाठी अर्ज करण्यात आला. न्यायालयाने संशयितांनी साक्षीदारांना धमकावू नये, सुनावणीला उपस्थित राहावे आदी अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी 2 जुलै रोजी होणार आहे. न्यायालय आवारात तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, आर. एम. चौगुले, संजय पाटील, कंटेश चलवेटकर आदी उपस्थित होते. म. ए. समितीच्या वतीने अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. एम. बी. बोंद्रे, अ‍ॅड. बाळासाहेब कागणकर, अ‍ॅड. रिचीमन नवग्रह यांनी काम पाहिले.

Back to top button